त्या कोरोना बाधित रुग्णावर मोहरे येथे अंत्यसंस्कार
शिराळा ता.:२८: शिराळा तालुक्यातील मोहरे येथील मृत झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांवर मोहरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर रुग्ण हे मुंबई येथे कापड मार्केट मध्ये कामाला होते. लॉक डाऊन सूरू झाल्याने व मुंबई येथे रुग्ण वाढत असल्याने ते मुंबईहून गावी येऊन होम क्वारंटाईन झाले होते. त्यांना बुधवारी २० मे रोजी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी २१ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील १४ जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ यांची कोरोनाची चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आले आहेत. या लहान भावावर उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी २७मे रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले, भाऊ,भावजय,पुतणे असा परिवार आहे.
0 Comments