खिरवडेच्या ५ जणांपैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह
शिराळा ता.२५:खिरवडे येथील मुंबईहून आलेल्या ५ जणांच्या घशाचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्या पैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.ते कुटुंब मुंबईहून २१मे रोजी येऊन गावात होम क्वारंटाईन झाले होते.कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या कुटुंबातील ५ जणांचे शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
या गावाची लोकसंख्या ८५० असून २९२कुटुंब आहेत.त्या ठिकाणी ६पथकांच्या माध्यमातून १२ कर्मचारी घरोघरी सर्व्हे सुरू आहे. गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक आर.बी.ठोंबरे, ए. एन.गरुड, आरोग्य सेवक एस.बी.पाटील, एस.डी.कोरे, आरोग्य सेविका ए.एम.निगडे, एस.ए.घागरे,एस.एम.कांबळे, ए. एस.खराडे, आशा गटप्रवर्तक सारिका कासार, यु.एन.पाटील,रुपाली सावंत, रेखा पाटील, आर.जे.म्होप्रेकर, पूजा पाटील, वंदना पाटील, सुरेखा मस्कर हे घरोघरी जाऊन जनजागृती व सर्व्हे करत आहेत.
चौकट-
पाडळेवाडी येथील तिघांचे, शिराळा व आंबेवाडी येथील प्रत्येकी एक अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या तिन्ही गावांना दिलासा मिळाला आहे. करुंगली येथील एकाच्या व खिरवडे येथील दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete