चिंचोलीच्या त्या युवकाच्या कुटुंबातील सहा जणांनचे शिराळा येथे संस्थात्मक अलगीकरण
शिराळा, ता.२८:चिंचोली(ता.शिराळा) येथील मुंबईहून आलेल्या 43 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याने त्याचा संपर्कातील कुटुंबातील सहा जणांना शिराळा येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.सदर व्यक्ती २२मे रोजी मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन झाली होती. त्यास मंगळवारी २६ मे रोजी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्या ठिकाणी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. काल बुधवारी (ता.२७) रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील सहा जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात अलगीकरण करण्यात आले आहे.
या गावाची लोकसंख्या १८०९ असून ३६७ कुटुंब आहेत.त्या ठिकाणी ७ पथकांच्या माध्यमातून १४ कर्मचारी घरोघरी सर्व्हे सुरू आहे. गावात औषध फवारणी केली जात आहे. गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक आर.बी.ठोंबरे, ए. एन.गरुड, आरोग्य सेवक सुरज पाटील,आय.पी.सनगर, एस.डी. देसाई ,आरोग्य सेविका ए.ए. कोतेकर ,आशा गट प्रवर्तक सारिका कासार, सुरेखा पाटील, आक्काताई जाधव,उषा जाधव,अंजना कवर, पद्मज्या कांबळे, रुपाली बने, एस.टी. जाधव हे घरोघरी जाऊन जनजागृती व सर्व्हे करत आहेत.
0 Comments