शिराळा:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी दहा हजाराची मदत नायब तहसिलदार विनायक महाजन यांच्याकडे सुपूर्द करताना आरळा गावचे ग्रामपंचायत सदस्य राम बदडे व शामराव बडदे |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी बडदे कुटुंबीयांची दहा हजाराची मदत
शिराळा:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी दहा हजाराची मदत नायब तहसिलदार विनायक महाजन यांच्याकडे सुपूर्द करताना आरळा गावचे ग्रामपंचायत सदस्य राम बदडे व शामराव बडदेशिराळा, ता.२६: कोरोनच्या संकटात आपल्याच बांधवांना सामाजिक बांधिलकी म्हणून आपणच मदत करण्याची गरज आहे. ते सामाजिक भान बडदे कुटुंबीयांनी चांगल्या प्रकारे जोपासले असल्याचे प्रतिसाद नायब तहसीलदार विनायक महाजन यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी आरळा गावचे ग्रामपंचायत सदस्य राम बदडे व शामराव बडदे यांनी दहा हजाराची मदत नायब तहसिलदार विनायक महाजन यांच्याकडे सुपूर्द केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी नायब तहसिलदार ए. डी.कोकाटे,दीपक पारधी, शाम ठाकूर, किरण काशीद शामराव बदडे उपस्थित होते.
27 मे.2020
0 Comments