सांगली जिल्ह्यात आज तीन रुग्ण कोरोणा बाधीत तर सहा जण कोरणामुक्त-जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी
सांगली दि 28 (जि. मा.का) सांगली जिल्ह्यात आज नवीन तीन रुग्ण कोरोणा बाधित झाले असून उपचारा खालील रुग्णांची संख्या 44 झाली आहे .आज अखेर 54 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर कोरोनाबाधित ठरलेले 101 रुग्ण असून पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तर आज सहा रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत . आज पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णांमध्ये गोरेवाडी तालुका खानापूर येथील मुंबईहून आलेल्या 45 वर्षे पुरुष, नवी मुंबईहून आलेला 57 वर्षीय नेरली तालुका कडेगाव येथील पुरुष, तर नरसिंह गाव तालुका कवठेमंकाळ येथील कोरोणाबाधित रुग्णाची आई
(26 वर्षीय) कोरोणा बाधीत झाली आहे.
ज्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे यामध्ये नेरली तालुका कडेगाव येथील 57 वर्षीय पुरुष असून सदर व्यक्ती मुंबईवरून आलेला प्रवासी आहे. सदरचा रुग्ण इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेला आहे . कडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षीय पुरुष ऑक्सीजनवर उपचार सुरू आहेत. खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षीय पुरुषावर ही नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर उपचार सुरू आहेत. तर सुलतानगादे तालुका खानापूर येथील 57 वर्षीय महिलेला ऑक्सिजन'वर ठेवण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .
आज दिनांक 28 मे रोजी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यात करणार कर्नाळ तालुका मिरज येथील 28 वर्षीय पुरुष , अंकले तालुका जत येथील 32 वर्षे पुरुष, रेड तालुका शिराळा येथील 42 वर्ष महिला, 49 वर्षे पुरुष , कुंडलवाडी तालुका वाळवा येथील 70 वर्षे पुरुष तर मरगळे वस्ती तालुका आटपाडी येथील 60 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
एक नजर
कोरोनाबाधित ठरलेले 101 रुग्ण
उपचारा खालील रुग्णांची संख्या 44
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक त्यात खिरवडे येथील रुग्णाचा समावेश
आज नवीन तीन रुग्ण कोरोणा बाधित
आज हे सहा रुग्ण कोरोणामुक्त
1) रेड तालुका शिराळा येथील पती- पत्नी,
2)कुंडलवाडी तालुका वाळवा येथील 70 वर्षे
3) कर्नाळ तालुका मिरज येथील 28 वर्षीय पुरुष
4) अंकले तालुका जत येथील 32 वर्षे पुरुष,
5)मरगळे वस्ती तालुका आटपाडी येथील 60 वर्षे पुरुष
0 Comments