खिरवडेत कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील खिरवडे गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे
1) जि.प. शाळा खिरवडे ते हौसाबाई पांडुरंग पाटील यांचे घर.
2) हौसाबाई पांडुरंग पाटील यांचे घर ते लक्ष्मण धोंडी जाधव यांचे घर.
3) लक्ष्मण धोंडी जाधव यांचे घर ते तानाजी तुकाराम पाटील यांचे घर.
4) तानाजी तुकाराम पाटील यांचे घर ते जि. प. शाळा खिरवडे, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे -
1) खिरवडे वसाहत ते शेडगेवाडी शिव (पूल)
2) शेडगेवाडी शिव (पुल) ते मेणी ओढा.
3) मेणी ओढा ते हात्तेगाव शिव.
4) हात्तेगाव शिव ते खिरवडे वसाहत.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
0 Comments