BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात आज तीन जण कोरोणा बाधित -जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी


     सांगली जिल्ह्यात आज तीन जण कोरोणा बाधित -जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी


सांगली दि २६:(जि.मा.का) जिल्ह्यात आज तीन जण कोरोना बाधित झाले असून उपचार खालील रुग्णांची संख्या 39 झाली आहे. आज अखेर 47 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून जिल्हात आजपर्यंत 88 जण  ठरले आहेत . यामधील तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. सांगली जिल्ह्यात आज कोरोणा बाधित झालेल्यांमध्ये कचरेवाडी तालुका तासगाव येथे मुंबईहून आलेला 32 वर्षीय पुरुष , बनपुरी तालुका आटपाडी येथील दिनांक २४ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे 41 वर्षीय वडील, बनपुरी तालुका आटपाडी येथीलच २४ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची दहा वर्षीय बहीण यांचा समावेश आहे.


कडेबिसरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षाचा पुरुष नांगोळे हे मुळगाव नसून रुग्णाने चुकीची माहिती दिलेली होती. आज त्यांच्या प्रकृतीत कालपेक्षा सुधारणा असून त्यांना ऑक्सिजनवर उपचार सुरु आहेत. मोहरे तालुका शिराळा येथील पन्नास वर्षाचा पुरुष सद्यस्थितीत ऑक्सीजनवर उपचार सुरू आहे . खिरवडे, तालुका शिराळा येथील 56 वर्षाचा पुरुष सद्यस्थितीत ऑक्सिजनवर उपचार सुरू आहे .धारावी ते मालगाव येथे बसने आलेल्यां मधील 75 वर्षीय महिला अतिदक्षता विभागात विशेष उपचाराखाली होती. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यातआले आहे.

 25 मे रोजी कोरोना मुक्त झालेला बलवडी येथील 55 वर्षाचा पुरुष अतिदक्षता विभागात होता. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे .  अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
एक दृष्टीक्षेप

  1.  जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित.
  2.  उपचार खालील रुग्णांची संख्या 39. 
  3.  47 रुग्ण कोरोना मुक्त.
  4. आजपर्यंत एकुण 88 जण कोरोनाबाधित. 
  5.  तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक 

Post a Comment

0 Comments