शिराळा येथे वडाच्या झाडाचा प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी.
शिराळा शहरातील विविध जुनी बांधकामे पाडून नवीन इमारती बांधण्याचे काम चालू आहे. गावातील गुरुवार पेठेत एक जुने घर पाडायचे काम राजेंद्र कानकात्रे यांच्या मार्फत सुरू होते. संबंधित घराच्या भिंतीवर वडाचे झाड नैसर्गिक रित्या उगवले होते. या झाडाने भिंतीवर चांगलाच जम धरला होता व ते बारा-पंधरा फूट उंच वाढले होते. मातीचे घर पाडत असताना हे झाड पण काढून टाकणार हे निश्चित होते.
दरम्यान, प्लॅनेट अर्थ फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी ते झाड पाहिले आणि राजेंद्र यांच्याशी चर्चा करून हे झाड दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करता येईल याची खात्री केली. त्यानंतर राजेंद्र यांनी JCB च्या सहाय्याने झाड भिंतीतून मुळासहित अलगद रित्या बाजूला केले व बायपास रोड जवळील दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेऊन दिले.
दिनांक ११ मे, रोजी हे झाड मंदिरासमोर जेसीबीच्या मदतीने खड्डा काढून यशस्वी रित्या प्रत्यारोपण(ट्रान्सप्लँट) करून लावण्यात आले. येत्या वटपौर्णिमेस हे झाड आसपासच्या महिलांना पूजनासाठी सज्ज असेल व मंदिराची शोभा वाढवेल.
या झाडाची उंची १२ ते १५ फूट असून आणि घेर चार फूट आहे. तसेच या झाडाच्या मुळ्या व्यवस्थित असून हे झाड पूर्णतः जगेल याची खात्री सर्व सदस्यांना आहे. झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी गुरव दिलीप कुंभार व परिसरातील व्यक्तींनी घेतली आहे.
तरी हे झाड लावत असताना ट्रॅकटरच्या सहाय्याने मदत करणारे राजेंद्र कानकात्रे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आकाश पाटील, प्रणव महाजन, समीर पिरजादे, राजेश दिंडे, दिनेश हसबनीस, विकास शहा तसेच जेसीबी ड्रायव्हर सदाशिव पाटील, बिऊर इत्यादी व्यक्तिंनी या कामात सहकार्य केले.
अश्या पध्दतीने तालुक्यातील कोणतेही झाड वाचवण्यासाठी संस्थेस संपर्क करावा हे आव्हाहन करण्यात आले आहे( संपर्क: 9657493161).
0 Comments