BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांच्यासाठी तोच झाला दाता


त्यांच्यासाठी तोच झाला दाता

शिराळा:येथे गरजू पत्रकारांना तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते जीवनावश्यक किटचे वाटप करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे,सेवानिवृत्त जिल्हा माहितीअधिकारी हंबीरराव देशमुख व पत्रकार
शिराळा : शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे यांनी स्वखर्चाने तालुक्यातील गरजू पत्रकारांना शिराळाचे तहसीलदार गणेश शिंदे  यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप  केले. त्यांच्यासाठी तोच झाला दाता
कोणतीही संघटना असली तरी त्याचा कॅप्टन हा महत्वाचा असतो.आपणाला मिळालेले पद हे शोभेसाठी नसून आपल्या समवेत असलेल्या बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी असते हे ज्याला समजते तोच खरा कॅप्टन असतो. हेच पत्रकार संघाचे शिराळा तालुकाध्यक्ष विजय गराडे यांनी कृतीतून दाखवले आहे.लॉक डाऊन मुळे अनेक पत्रकारांना केवळ पत्रकारितेवर अवलंबून असल्याने दिवसेंदिवस आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.जाहिरात नाही व आदी घेतलेल्या जाहिरातीचे पैसे मिळालेले नाहीत. ह्या अशा दुहेरी संकटात पत्रकार सापडलेले आहेत. केवळ घरात बसून घरखर्च चालवायचा कसा हा प्रश्न सर्वांना भेडसावत असल्याने पत्रकारांना ह्या कठीण काळात मदतीची गरज असल्याची चर्चा पत्रकार ग्रुपवर सुरू झाली. मदत मागायची कोणाकडे हा सर्वांच्या समोर प्रश्न होता. त्यावेळी आपल्या मदतीला कोण येईल अन आपणाला मदत होईल याची वाट पाहण्या पेक्षा आपल्या व्यथा आपणालाच माहीत हे मनासी  ठाम ठरवून अध्यक्ष विजय गराडे यांनी स्वखर्चाने पत्रकार बांधवाना मदत करण्याचा निर्णय घेतला. गरजू पत्रकारांना तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते व सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  जीवनावश्यक किटचे वाटप केले.
      या शिवाजीराव चौगले, अरूण पाटील, प्रा. दिपक तडाखे, अजय जाधव, नवनाथ पाटील, दत्ता पाटील, रणजीत चव्हाण, मनोज मस्के, दत्तात्रय तडाखे, आनंदा सुतार, नथुराम कुंभार, शिवाजी कुंभार, शुभम कुंभार, हिंदुराव पाटील, सुरेश पवार, अनिल झाडे,कु.विराज गराडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments