BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बापलेकांच्या संघर्षाला मिळाले मित्रत्वाचे बळ



बापलेेकांच्या संघर्षाला मिळाले मित्रत्वाचे बळ

शिराळा,: कोरोनाच्या संकटाला सर्वजण सामोरे जात असताना आपले कर्तव्य बजावण्यासाठी अंथरुणार खिळलेल्या बाप्पाला सोडून तो कामावर गेला. अन् त्याचा वडिलांच्या सेवेला मित्रपरिवार धावून आला.ही कहाणी आहे शिराळा तालुक्यातील शिराळेखुर्द  येथील गणेश पाटील व सदाशिव पाटील या बापलेेकांची.

गेले आठ वर्षापासून सदाशिव पाटील हे अर्धांगवायूने आजारी असून अधून मधून फिटचा त्रास सुरू आहे. त्यांना तीन  विवाहित मुली व गणेश हा एक मुलगा आहे. गणेश ठाणे येथे पोलिसमध्ये आहे. ९ मार्च रोजी गणेश यांच्या वडीलांना ह्रदयविकाचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नंतर कोल्हापूर येथे दाखल केले. त्या ठिकाणी दहा दिवस उपचार केले असता त्यांना बरे होण्यासाठी किमान एक वर्ष लागणार असल्याचे सांगण्यात आले.त्याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस ठाण्यात कामावर हजर राहण्याचा आदेश आला. त्यावेळी त्यांच्या पायाखालची  वाळू सरकली. घरी आई एकटीच.तिचे ही दोन महिन्यांपूर्वी मोठे ऑपरेशन केले आहे. आता करायचे काय या विचाराने त्यांना काहीक्षण सुचायचे बंद झाले.एकीकडे आजाराशी झुंजणारे वडील आणि दुसरीकडे कर्तव्य दोन्ही एकाच वेळी आल्याने पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. त्यावेळी तू कामावर जा
 मी त्यांना कसेतरी सांभाळते असा आग्रह आईने धरला. चुलत भाऊ श्रीधर आणि मित्र सागर यांनी त्यांना धीर देत तू कामावर जा आम्ही गुरुजींची वडील म्हणून सेवा करतो असे वाचन दिले. त्यावेळी गहिवरून गणेशने वडिलांना दवाखान्यातुन घरी आले.त्यांना नातलग व मित्रपरिवार यांच्या स्वाधीन करून ठाणे येथे पोलीस ठाणे गाठून कामाला सुरुवात केली.
  सदाशिव पाटील हे शिक्षक त्यांनी मणदूर,पुनवत,फुफिरे,खूजगाव येथे सेवा बजावली. त्यानी गावात स्वतःची कूपनलिका २००९ ला सुरू केली. त्यावेळी गावात नळ पाणी पुरवठा योजना नव्हती. लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. लोकांचे हे पाण्याचे हाल पाहून गुरुजींनी गावात तीन ठिकाणी कूपनलिकेच्या पाण्याची पाइपलाइनद्वारे सोय केली. त्यांना महिना तीन ते चार हजार रुपये विद्युत बिल येत असे.त्यासाठी लोक त्यांना पैसे देत असताना त्यांनी पैसे घेतले नाहीत. लोकांना मोफत पाणी देऊन पाच वर्षे एक वेगळी समाज सेवा केली.आज ही गरज असेल तिथून लोक हक्काने पाणी घेतात. त्यांना लहान मुलांची आवड जास्त आहे. त्यांची असणारी सामाजिक धडपड पाहून त्यांच्या मदतीला लोक धावून येत आहेत.
सध्या ते अंथरुणावर खिळून आहेत.त्यांना  दिसायचे बंद झाले आहे. त्यांच्या मनावरील ताबा सुटत असल्याने मुलांना शिकवत असल्यासारखे पाढे,कविता बडबडत आहेत. त्यांच्या मनात शाळा व मुले अजून ही  घर करून आहे. पती पत्नी दोघेच घरी आहेत. पत्नीचे ऑपरेशन झाल्याने त्यांना ही जास्त हालचाल जमत नाही.त्यामुळे त्यांना अंघोळ घालणे,वेळेत औषध देणे,मसाज करणे ही कामे त्यांचा पुतण्या श्रीधर,यांच्यासह आर्मीत असणारा गणेशचा मित्र सागर पाटील,चुलते मारुती पाटील यांच्यासह हरी पावले, सचिन पावले, दिपक पाटील ,दत्ताजीराव आंधळकर, अरूण पाटील, संदीप पाटील  आपआपल्या सोयीनुसार दररोज करीत आहेत. आपल्या वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे होत असल्याने गणेश चांगल्या प्रकारे आपली ड्युटी करता आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी गणेश रस्त्यावर तर त्याच्या वडिलांच्या सेवेसाठी माणुसकीच्या नात्याने मित्र परिवार त्याच्या घरी सेवा करता आहेत.
चौकट- अशी ही सेवा
गणेश व सागर हे मित्र आहेत. सागर हे आर्मीत आहेत.लॉक डाऊन मुळे ते गावी असल्याने दररोज गणेशच्या वडिलांची सेवा करत आहेत.सागर यांना सध्या लॉकडाऊनमुळे देश सेवा करता आली नसली तरी देश सेवा करणाऱ्या मित्राच्या  वडिलांची सेवा करण्याचे भाग्य लाभत आहे.  त्यामुळे त्यांच्या मैत्रीची चर्चा सुरू आहे.ते

 वडिलांनाही आवडले नसते

मी वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने कामावर गेलो नसतो तर ते वडिलांनाही आवडले नसते.  आपले काम प्रामाणिकपणे करण्याची त्यांची शिकवण आहे. मी नसताना वडिलांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जात असल्याने मी चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहे.

गणेश पाटील 

Post a Comment

0 Comments