सांगली मिशन सोसायटीने केले वाटप
शिराळा,ता.३: सांगली मिशन सोसायटीचे वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर केलेल्या व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सांगली मिशन सोसायटीचे मदतीचा उपक्रम सातत्याने सुरू असतो.मिशन सोसायटीचे फादर रोशन निदही यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सौ गितांजली पाटील यांनी पन्नास स्थलांतरित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे पाचशे रुपये किंमतीचे कीट वाटप करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, गीतांजली पाटील,बळवंत पाटील, जयवंत पाटील, पोपट देसाई उपस्थित होते.
0 Comments