BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी ठरवलं आता रडायचं नाय लढायचं

त्यांनी ठरवलं आता रडायचं नाय लढायचं

शिराळा: निगडी (ता.शिराळा) येथे दोन कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वांचेच धाबे दणाणले. मात्र या गावात २४ रणरागिनींनी  घरच्यांचा विरोध पत्करून आता रडायचे नाय तर लढायचं म्हणून गेले १४दिवस घरोघरी सर्व्हे करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले आहे. त्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुंबईहून आलेल्या युवतीला कोरोनाची लागण झाली अन तालुका हादरून गेला. गावात घरोघरी सर्व्हे करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेवीका ९ व अंगणवाडी सेविका १४  व गट प्रवर्तक १ अशा २४ जणांच्यावर आली. कोरोनाचा रुग्ण असलेल्या गावात सर्व्हे करण्यासाठी जाण्यास बाहेरील गावातील आशा व अंगणवाडी यांच्या घरातील लोकांचा विरोध होता.आपणाला नोकरी नसली तरी चालेल पण तुम्ही सर्व्हेला जाऊ नका.  असा दबाव त्यांच्यावर येत होता.त्यावेळी काहीजणीची मने खचली होती.पण हे संकट केवळ आपल्या गावावर नाही तर जगभर आहे.त्या ठिकाणी आपल्या प्रमाणे काम करणारी यंत्रणा आहे. ते लोक ही आपल्या जीवाची पर्वा न काम करत आहेत मग आपण का माघार घ्यायची हा विचार सर्वांनी मिळून केला. आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी आपणाला घ्यावी लागणार आहे.  हे गृहीत धरून आता रडायचे नाय तर लढायचे हा निर्धार करून १२पथकांच्या माध्यमातून दररोज सलग १४ दिवस घरोघरी सर्व्हे  करून ३६६ कुटुंबातील १५८४ लोकांची तपासणी केली. कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या गावातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.त्यामूळे या गावाने कोरोनावर मत केली आहे.अहवाल निगेटिव्ह आल्याने  त्या गावा बरोबर आपले कुटुंब सुरक्षित असल्याने त्या २४जणींच्यासह घरातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. गेले १४ दिवस तणावाच्या वातावरणात काम करणाऱ्या त्या रणरागिनींच्या चेहऱ्यावर आपण कोरोनाची लढाई जिंकल्याचा आनंद दिसून येत आहे. या काळात त्यांचे तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील,सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.डी.राजमाने, डॉ एस.बी. पवार, आरोग्य सहाय्यक डी.बी चौगुले ,आशा गटप्रर्वतक एस.एस.कुंभार, आरोग्य सहायिका एम.एम.खेडकर ,व्ही.एस. डवरी, एकनाथ झाडे,छगन मंडले, राजाराम बागल, पृथ्वी शेवाळे, विकास कापसे यांनी त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले.

निगडीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याने त्या ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या घरातून विरोध होता. पण घरच्यांचा विरोध डावलून आम्ही सर्वांनी आता रडायचं नाय तर लढायचं हा निश्चय करून सर्व्हेचे काम सर्व वरिष्ठांच्या सूचनेनुसार पूर्ण केले.आम्ही ही लढाई जिंकलो याचा आम्हाला अभिमान आहे.

सौ. सुनीता कुंभार आशा गटप्रवर्तक


Post a Comment

2 Comments

  1. जिवापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले आणि ते यशस्वी रित्या पार पाडणार्या सर्व योद्ध्यांना सलाम.

    ReplyDelete
  2. तणावाच्या वातावरणात काम करणाऱ्या रानागिणीचा आम्हा शिराळकरांना अभिमान आहे

    ReplyDelete