BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घरी आलेल्यांची माहिती लपवाल तर होणार गुन्हा दाखल

घरी आलेल्यांची माहिती लपवाल तर होणार गुन्हा दाखल

शिराळा, ता.२:शिराळा नगरपंचायत शिराळा क्षेत्रात पुणे,मुंबई,इतर गावे अथवा इतर राज्ये येथून सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने अथवा परवानगीशिवाय अनेक नागरिक दाखल होत आहेत.त्यांच्या बद्दल तात्काळ माहिती न दिल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिला आहे.
यावेळी ते म्हणाले, शिराळा नगरपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिकांना सुचित करणेत येते की,ज्याच्या घरी पुणे,मुंबई,इतर गावे अथवा राज्ये येथून कोणताही व्यक्ती दाखल झाल्यास तात्काळ या व्यक्तीची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपंचायत सदस्य (नगरसेवक),आरोग्य अधिकारी,नगरपंचायत कार्य़ालय फोन नंबर -०२३४५ २७२०११ संबंधित वार्ड लिपीक यांना उपलब्ध करून द्यावी.जेणेकरून नगरपंचायतीला या व्यक्तीची वैदयकीय तपासणी करवून पुढील उपाययोजना करता येतील. या सुचनेचे पालन न करता कोणीही परगावाहून आलेल्या व्यक्तींची माहिती लपवून त्या व्यक्तीला आपल्या घरात प्रवेश दिल्यास त्यांच्या विरूध्द भारतीय दंड संहिताच्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments