BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लॉकडाऊन मध्येही विद्यार्थ्यांच्या होम स्टडीवर ऑनलाईन डाकरे बंधूंचा कब्जा


महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून 'स्टडी फ्रॉम होम' या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून प्रविण व जयदीप डाकरे या प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही बंधूंनी दीडशेहून अधिक ऑनलाईन टेस्ट देऊन मुलांच्यावर कब्जा केलाय.

 लॉकडाऊन मध्येही विद्यार्थ्यांच्या होम स्टडीवर ऑनलाईन डाकरे बंधूंचा कब्जा

        शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिक्षण घेत असतात.सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊन असल्याने हजारो शाळा बंद आहेत. अचानक शाळा बंद झाल्याने विद्यार्थी देखील गोंधळून गेले आहेत. या लॉकडाऊनमध्ये कोणतीही सक्ती न करता त्यांनी कोणता अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, आरोग्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती प्रत्येक शिक्षकांनी शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे.
          शिक्षण हे आनंददायी व विद्यार्थीप्रिय असल्यास त्यात अधिक रुची निर्माण होते, या उक्तीचा आधार घेत लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून 'स्टडी फ्रॉम होम' या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून प्रविण व जयदीप डाकरे या प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही बंधूंनी दीडशेहून अधिक ऑनलाईन टेस्ट देऊन मुलांच्यावर कब्जा केलाय
.
 संगणकाचा वापर करून गुगल फॉर्म च्या मदतीने इयत्तावार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन टेस्ट बनवून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून  नियमित विद्यार्थ्यांना व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून अभ्यास देत आहेत. त्यांनी या महिन्याभरात जवळपास दीडशेहून अधिक ऑनलाईन टेस्ट बनवलेल्या असून पालकांचे व्हाट्सअप ग्रुप करून अथवा ब्रॉडकास्ट ग्रुपच्या माध्यमातून दररोज सकाळी अभ्यासाची पोस्ट शेअर केली जाते. त्यामुळे विद्यार्थी दिलेला अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करतात व ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवली आहे, त्यांचा रिपोर्ट देखील गुगल फॉर्म च्या मदतीने प्राप्त होतो. www.gurumauli.in या संकेतस्थळावर शिक्षण पूरक सर्व माहिती पोस्ट केली जाते. याचा वापर महाराष्ट्रातील हजारो शिक्षक विद्यार्थी व पालक करत आहेत. या महिनाभरात जवळपास साडे चार लक्ष भेटी देत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन टेस्ट सोडवल्या आहेत.
          महाराष्ट्रात तंत्रस्नेही चळवळीचं वारं जोमाने सुरू असून यामध्ये अनेक शिक्षकांनी भरारी घेतलेली दिसून येते. हजारो तंत्रस्नेही शिक्षक यांच्या मदतीने शासनाचे दीक्षा ॲप देखील विकसित झालेले आहे. या ॲपमध्ये देखील या बंधूंचे घटक समाविष्ट आहेत. शैक्षणिक व्हिडिओ बनवून युट्यूबच्या माध्यमातून इतरांना पोहोचवणे,pdf निर्मिती करणे, ॲपच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षांची माहिती टेस्ट स्वरूपात व कविता,शैक्षणिक परिपाठ ऑडिओ स्वरुपात पोहोचवणे; शिक्षकांना व्हिडिओ निर्मिती, ॲप निर्मितीसारखे तंत्रस्नेही ज्ञान पोहोचवणे यासारखे वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग त्यांनी केले आहेत. आनंददायी व इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक प्रयोग राबवत असल्याने या दोन्ही बंधूंच्या शाळा आज सर्वत्र चमकत आहेत.
          वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयोगामुळे त्यांना राज्य स्तरावरदेखील सन्मानित केले असून त्यांचे प्रेरणास्थान मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख असून महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांचे सहकार्य त्यांना लाभत आहे.

Post a Comment

0 Comments