BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कौतुक अवनीशच्या प्रामाणिकपणा आणि दातृत्वाचे


कौतुक  अवनीशच्या प्रामाणिकपणा आणि दातृत्वाचे


शिराळा,ता.११: त्या चिमुकल्याने समाज माध्यमाच्या माध्यमातुन त्या काकांना शोधून त्यांना  अडीच हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे दिली. त्याला मिळालेल्या ५००रुपयच्या  बक्षिसाचे सॅनिटायझर घेऊन कोल्हापूर महागनर पालिकेला दिले. अवनिशच्या या प्रामाणिकपणाचे व दातृत्वाचे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  कौतुक केले.

ही कहाणी आहे  कोल्हापूरच्या अवनीश सोनवणकर या ११ वर्षाच्या चिमुकल्याची. तो नेहमी प्रमाणे कोल्हापूर येथे सकाळी बाबांच्या समवेत फिरायला बाहेर पडला. फिरत असताना रस्त्यात त्याला पाकीट सापडले. त्यात रोख रक्कम २५०० व  महत्वाची कागदपत्रे होती. रस्तावरून वाहने जात असल्याने  नेमके हे पाकीट कोणाचे त्या बाप लेकांच्या लक्षात येत नव्हते. त्या पाकिटात असलेल्या त्या कार्डवरून  संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यावेळी छोट्या  अवनीशला मात्र चैन पडत नव्हता. ज्यांचे पाकीट पडले ते काका आता काय करतील म्हणून बाबांबरोबर त्या परिसरता कुठे कोण सापडतेय का याचा शोध घेलता.पण कोणी सापडले नाही. मग तुला चिमुकल्याने समाज माध्यमाचा उपयोग केला. कार्डवर असलेल्या नाव व पत्ता टाकून पाकीट आपणाला सापडले असून तो घेऊन जावे असे आवाहन केले.त्यावेळी  कळंबा येथील युवराज तिवले यांचे पाकीट असल्याची खात्री पटली. त्यांनी अवनीशच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याला पाचशे रुपये बक्षीस दिले.मात्र त्या पाचशे रुपया पेक्षा आपण त्या काकांचे पाकीट व कागदपत्रे त्यांना परत केली याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर खरेदी करून ते कोल्हापूर महानगर पालिकेकडे सुपूर्द केले.त्याच्या  या प्रामाणिकपणाचे व दातृत्वाचे कोल्हापूर महानगर पालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कौतुक केले.
 आपल्या मुलाच्या दातृत्व व प्रामाणिकपणामुळे त्याच्या आई वडिलांची छाती अभिमानाणे उंचावली.

Post a Comment

0 Comments