अडचणीत असलेल्यांच्यासाठी पाणी पुरवठा व मजूर संस्थांनी मदतीचा हात द्या-दिनकरराव पाटील(गुरुजी)
शिराळा, ता.३०: लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या व ज्यांची रोजंदारी थांबली आशा लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी पाणी पुरवठा व मजूर संस्थानी पुढे यावे असे आवाहन विश्वास कारखान्याचे संचालक दिनकर पाटील यांनी केले.
बिऊर (ता शिराळा) येथील संगमेश्वर पाणी पुरवठा संस्था एक व दोन आणि दत्त मजूर संस्था यांचे कडून करोना कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपये धनादेश देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संस्थेचे संस्थापक व विश्वास कारखाना संचालक दिनकरराव पाटील यांनी हा धनादेश सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी सॊमनाथ साळवी यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी पाटील म्हणाले,जगभर कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र संचार बंदी आहे.या काळात परगावच्या लोकांना दिलासा देणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना शासनाकडून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला जात आहे.त्यास आमच्या संस्थेचा खारीचा वाटा असावा म्हणून ही मदत केली जात आहे.इतर पाणी पुरवठा व मजूर संस्थांनी मदती साठी पुढे येण्याची गरज आहे.
या वेळी विश्वास चे संचालक दिनकर पाटील, विश्वास कदम, दिगंबर पाटील, श्रीकांत पाटील, युवराज पाटील,सचिव अमोल पाटील उपस्थित होते.
0 Comments