या गावात रात्री आला बिबट्या
शिराळा,ता.१९:कांदे (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका मेंढी ठार तर एक जखमी झाली.याबाबत समजलेली माहिती अशी,कांदे येथील नाळ परिसरात निवास पाटील यांच्या शेतात रावसाहेब विठोबा कोळेकर यांनी मेंढ्या बसवल्या होत्या. त्याठिकाणी रात्री अचानक बिबट्याचे हल्ला करून एक मेंढी ओढून नेली तर एका मेंढीचे मानेवर हल्ला करून जखमी केले.
त्यामुळे कांदे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली. लाॅक डाऊन मुळे कर्नाटक राज्यातील रावसाहेब कोळेकर शिराळा तालुक्यात अडकले आहेत.
तीन दिवसांपूर्वी चरण येथील शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. सध्या पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांना गती आली आहे.मात्र बिबट्याचा वावर वाढल्याने शेतात जाण्यासाठी लोकांना भीती वाटत आहे.
0 Comments