सोशल डिस्टन्स तसेच सर्व उपायायोजनांची अंमलबजावणीस बांधील राहून आधार केंद्रे सुरु- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली दि. 14: (जि.मा.का) कोरोना विषाणूचे संसर्ग रोखणेकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व आधार केंद्रे बंद करण्यात आली आहेत. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व आधार केंद्रे सोशल डिस्टन्स तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपायायोजनांची अंमलबजावणीस बांधील राहून सुरु करण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.आधार केंद्र सुरु करण्यासाठी आधार केंद्र चालकास पुढील नियम व अटीचे तंतोतंत पालनकरणे बंधनकारक आहे.
1) सर्व आधार केंद्रातील सामग्री/उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
2) आधार केंद्रातील केंद्र चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उदा. वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इ.
3) आधार केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतली.
4) आधार केंद्रातील ऑपरेटर व येणाऱ्या नागरिकांनी पुर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढणेच्या वेळेस मास्क काढणेस परवानगी देणेत यावी.
5) आधार केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालक केले पाहिजे.
6) प्रत्येक आधार नोंदणी/अद्यावत झाल्यानंतर बायोमेट्रीक उपकरणे स्वच्छ करणे बंधनकारक आहे.
7) आधार केंद्र व्यवस्थापक टेबल/ऑपरेटर स्थानकांदरम्यान शरीरिक अंतर किमान 1 मीटर सुनिश्चित करणे आवश्यक आहे तसेच जास्त गर्दी टाळण्यासाठी आधार केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जाऊ नये
8) नागरिकांना समाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहीत करावे.
9) नागरिकांना किंवा कम्रचाऱ्यांना खोकला, ताप, कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादीसारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी आधार केंद्रात न येणेबाबत फलक लावावेत.
10) प्रत्येक आधार नोंदणी केंद्र युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसार नागरिकांसाठी पत्रक दर्शणी भागात लावावेत.
11) आधार केंद्रावरील ऑपरेटरनी कोविड-19 च्या हॉटस्पॉटवर जाणे किंवा अशा भागातून प्रवास करु नये.
12) प्रतिबंधीत क्षेत्रातील आधार केंद्रे चालू करण्यात येऊ नये.
13) जिल्ह्यामध्ये आधार केंद्रात शिबीर घेऊ नयेत.
वरील नियमांचे उल्लंघन झालचे निदर्शनास आलेस आपणावर उपरोकत आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्था शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
0 Comments