BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांना निरोप आला गावी जाण्याचा अन् गेले देवाघरी


त्यांना निरोप आला गावी जाण्याचा अन् गेले देवाघरी

विटा : २२: त्यांची गावी जाण्याची सोया झाली. पण आनंदाच्या भरात गावी न जाता देवाघरी गेले.
ही कहाणी आहे विटा येथे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या  रामसखा सत्तन  मौर्य (वय ५५ ) यांची .ते गेले अनेक वर्षांपासून विटा येथे हातमाग कामगार म्हणून होते. त्यांचे कुटुंबीय उत्तरप्रदेश मध्ये अर्जुनपठाक येथे आहेत . ते गावी जाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. येथील तहसिलदार कार्यालयात ऑनलाईन पाससाठी अर्ज केला होता .
आज  गुरुवारी सकाळी गावी जाण्याची सोया झाल्याचा तहसिलदार कार्यालयातून फोन आला .उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता विटा बसस्थानक वरून मिरजसाठी एसटी होती. मिरजेतून उत्तर प्रदेशकडे जाण्यासाठी रेल्वेची सोय केली होती. त्यामुळे तुम्ही आवरून या , असे सांगण्यात आले.एवढ्या दिवस आपल्या लोकांच्यापासून दूर राहिलेल्या राम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आत्ता मी माझ्या गावी आपल्या माणसात जाणार या विचाराने आनंदित होऊन मुंढेमाळ्यातील परिसरात राहणाऱ्या मित्राला ही आनंदवार्ता सांगण्यासाठी पळतच सुटले .  जात असताना वाटेतच चक्कर येऊन पडले . त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यांचे गावी जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.ते आपल्या नाही तर  देवाघरी गेले.त्यांच्या या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments