BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येळापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची पाहणी


लोकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा देऊ -आमदार मानसिंगराव नाईक


येळापुर : येळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लवकर पूर्ण करून या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देऊ असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले
           येळापूर (ता शिराळा ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या जागेच्या पाहणी प्रसंगी बोलत होते.यावेळी आमदार नाईक म्हणाले, लवकर येथे इमारत उभा राहून नागरिकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्याच्या सोई, सुविधा उपलब्ध करून , देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
 यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अतुल केकरे, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. वाय. देवकर, नाईक दूध संघाचे माजी संचालक अशोक कडोले, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे, सरपंच मारुती कांबळे, शिवाजी पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments