BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू


विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

महिलळा तालुक्यातील सागाव येथे श्रीमती शारदा शिवाजी कुंभार (वय ६२) या वृद्ध वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.                                            याबाबत तुषार कुंभार यांनी पोलिसात फिर्याद दिली. घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,शारदा व सुंदाबाई कुंभार या जाऊबाई सायंकाळी चारच्या दरम्यान सागाव- शिराळा रस्त्यालगत कुंभार ओघळाजवळ शेतात गुरांना ऊसातील चारा काढण्यासाठी गेल्या होत्या.दरम्यान वा-याच्या वेगाने शेताच्या उत्तरेकडील बांधावरील झाड मोडून,थेट वीजेच्या तारेवरती पडले.त्या वीजेच्या प्रवाह असणाऱ्या तारा तुटून थेट शारदा कुंभार यांच्या अंगावरती पडल्याने,त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    दरम्यान त्यांच्या जाऊ  सुंदाबाई अगोदरच चारा घेऊन बाहेर आल्या होत्या.त्यांनी शारदा यांना बाहेर येण्यासाठी हाका मारु लागल्या.शेतातून काही प्रतिसाद मिळेना,म्हणून त्या पुन्हा आता गेल्या.त्यावेळी त्यांना शारदा निपचित पडलेल्या दिसल्या.त्यांच्या जवळ वीजेच्या तारा दिसल्याने,त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. सुदैवाने त्यांना कोणताही धोका पोहचला नाही.त्यांनी आरडा- ओरडा केल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीजप्रवाह तात्काळ बंद करण्यात आला.दरम्यान उपसरपंच सत्यजित पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती देऊन, घटनास्थळावरती सर्वतोपरी सहकार्य केले.           
   अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल पाटील,पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार छन्नुसिंग रजपूत,पोलिस नाईक अरुण कानडे करत आहेत.



Post a Comment

0 Comments