BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वंचितांना लोकनेते फतेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्ट मार्फत कोरोना सर्व्हे प्रोत्साहन भत्ता आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वाटप


शिराळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वंचितांना लोकनेते फतेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्ट मार्फत  कोरोना सर्व्हे प्रोत्साहन भत्ता आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वाटप

शिराळा येथील नागरपचायतीमध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका रोख रक्कम वाटप प्रसंगी सौ. सुनीतदेवी व आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी इतर मान्यवर.
शिराळा,ता.२३: कोरोना सर्व्हेच्या प्रोहत्सान भत्या पासून वंचित राहणाऱ्या शिराळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ३६महिलांना लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रष्ट मार्फत प्रत्येकी एक हजार रुपयांची रोख रक्कम आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा अर्चना शेटे, सौ. सुनीतादेवी नाईक प्रमुख उपस्थित होत्या. यावेळीआमदार नाईक म्हणाले, कोरोना विषाणूच्या लढयात गाव पातळीवर महत्वाची भूमिका बजावत असलेल्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचारिका व पर्यवेक्षक यांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे. हा भत्ता ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग योजनेतून देण्याचे निर्देश आहेत. पण नगरपंचायत क्षेत्राला चौदावा वित्त आयोग योजना येत नाही. त्यामुळे शिराळा तालुक्यातील एकमेव शिराळा नगरपंचायत क्षेत्रातील एकूण छत्तीस महिला या लाभापासून वंचित राहत होत्या. त्यांना लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रष्ट मार्फत प्रत्येकी एक हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. यामध्ये आशा स्वयंसेविका १४, अंगणवाडी सेविका १९, अर्धवेळ परिचारिका २, पर्यवेक्षक १, अशा एकूण छत्तीस जणांचा समावेश आहे.
 कोरोनाचे आलेले संकट कायम आहे. त्याबाबत प्रत्यकाने काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी टाळणे, परिसर व स्वतःची स्वछता ठेवणे, शासनाने दिलेल्या नेर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वात मोठया शिराळा नगरपंचायत क्षेत्रात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नाही, ही कौतुकाची बाब आहे. इथल्या पोलीस, आरोग्य, प्रशासन, नगरपंचायत, सफाई कामगार, व्यापारी, उद्योजक, युवक व नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
प्रारंभी स्वागत संजय इंगवले यांनी केले. मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 'विश्वास'चे  संचालक विश्वास कदम प्रवीण शेटे, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, माजी नगराध्यक्षाष सुनंदा सोनटक्के,  नगरसेवक गौतम पोटे, संजय हिरवडेकर, सुनीत निकम, प्रतिभा पवार, मोहन जिरंगे, विजय दळवी, डॉ. जी. डी. राजमाने, डॉ. जयंत कदम, आरोग्य सहायक डी. बी. चौगुले, नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments