BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा चौघांना चावा

मांगलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा चौघांना चावा


शिराळा, ता.२७:मांगले (ता.शिराळा) येथील चौघांना  पिसाळलेल्या कुत्र्याने चौघांना चावा  घेऊन जखमी केले.
प्रमोद परशुराम पाटील (वय १०),सौ.उज्वला संजय कांबळे( वय ५०),रघुनाथ बापू शेवडे (वय ६४),सागर अरुण गोसावी (वय १९) यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. त्यांच्यावर मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. नरेंद्र घड्याळे यांनी उपचार केले . मांगलेत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. काही पाळीव जनावरांच्यावर त्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे.

Post a Comment

0 Comments