BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खिरवडे येथील वृद्धास कोरोनाची लागण


खिरवडे येथील वृद्धास कोरोनाची लागण

शिराळा, ता.२४:खिरवडे (ता.शिराळा) येथील मुंबईहून आलेल्या ५६वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे. मोहरे पाठोपाठ खिरवडे येथे कोरोनाची लागण झाल्याने शिराळा पश्चिम भागात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सदर व्यक्ती २१मे रोजी मुंबईहून आपल्या कुटुंबातील चार व्यक्तीसह येऊन घरी क्वारंटाईन झाली होती. काल शनिवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्या ठिकाणी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती.आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे.  सध्या शिराळा तालुक्यात कोरोनाची लागण होऊन उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाची संख्या आठ झाली आहे. शिराळा तालुक्यता मुंबईहून येणाऱ्या लोकांच्यात वाढ होत असून तालुक्यात रुग्णची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
         सांगली जिल्ह्यात 82 रुग्ण कोरोणा बाधित असून यामध्ये आज नवीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत उपचाराखाली 34 रुग्ण आहेत . यामध्ये आज चार रुग्ण नवीन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत‌. आतापर्यंत 46 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून यात आज कोरोणामुक्त झालेल्यांची संख्या ३ आहे.
जिल्ह्यात आजतागायत २ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे .आज कोरोना  पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांमध्ये बनपुरी तालुका आटपाडी येथील पंधरा वर्ष तरुण समाविष्ट असून तो मुंबईहून आला आहे. तर खिरवडे तालुका शिराळा येथील मुंबईहून आलेल्या 56 वर्षे पुरुषाचाही यात समावेश आहे . काल नागोळे येथे  कोरोणा बाधित असणाऱ्या रुग्णाचा 22 वर्षीय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे. धारावी ते मालगाव बस प्रवास केलेल्या सर्व 22 लोकांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांचे स्वाब घेण्यात आले होते. या मधील 20 जण कोरोना निगेटिव्ह असून एक 75 वर्षीय महिला कोरोणा बाधित ठरली आहे. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे . पॉझिटिव्ह पैकी सद्यस्थितीत तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आज कोरणामुक्त झालेल्यांमध्ये भिकवडी खुर्द च्या दोन तर अंकले जत येथील एकाचा समावेश आहे.
लक्ष्मीनगर येथील कोरोणा बाधिताचा अहवाल निगेटिव्ह आले होते .तथापि त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे . तर विटा येथील संशयित मृताचा कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments