BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार


बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

शिराळा, ता.२०:कांदे (ता.शिराळा ) येथे खुरी परिसरातील सतीश विश्वास पाटील यांच्या वारू पाटलाची खडी येथील जनावरांच्या शेड मधील काळवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले.
ही घटना मंगळवारी रात्री घडली. आज सकाळी सतीश पाटील नेहमी प्रमाणे  जनावरांना वैरण घालण्यासाठी गेले  होते. त्यावेळी कालवड मृतावस्थेत आढळून आली . सदरच्या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यां देण्यात आली. वनपाल संभाजी पाटील यांनी पंचनामा केला. यावेळी राहुल पाटील,संजय पाटील,विशाल पाटील,किरण पाटील,अनिल कुंभार,गणेश पाटील उपस्थित होते.
सोमवारी याच गावात नाळ परिसरात  निवास पाटील यांच्या शेतात रावसाहेब विठोबा कोळेकर यांनी मेंढ्या बसवल्या होत्या. त्याठिकाणी रात्री अचानक बिबट्याचे हल्ला करून एक मेंढी ओढून नेली तर एका मेंढीचे मानेवर हल्ला करून जखमी केले होते. सलग दोन दिवस बिबट्याने पाळीव प्राण्यांच्यावर हल्ला केल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments