चिंचोली येथील एकास कोरोनाची लागण
सांगली: सांगली जिल्ह्यात आणखीन सहा जण कोरोना बाधित झाले आहेत.यामध्ये वाटेगाव, तालुका वाळवा येथील 34 वर्षीय पुरुष, खेराडे वांगी तालुका कडेगाव येथील 45 वर्षीय स्त्री , कामत, तालुका आटपाडी येथील 54 वर्षीय स्त्री (सदर महिलेचा पती पूर्वीच
पॉझिटिव्ह आला असून ऍडमिट आहे .)
शिरगाव , तालुका तासगाव येथील 62 वर्षे पुरुष, ठाणापुडे, तालुका वाळवा येथील 29 वर्षीय पुरुष, चिंचोली, तालुका शिराळा येथील 43 वर्षे पुरुष कोरोणा बाधित झाले आहेत. हे सर्वजण मुंबई येथून आलेले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
0 Comments