BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखाण्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प बंद


विश्वास कारखाण्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प बंद 


शिराळा  : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाण्याचा सहवीज निर्मिती प्रकल्पातून सन २०१९-२० हंगामात एकूण ५ कोटी १३ लाख २६ हजार ४७ युनिट वीजनिर्मिती झाली असून टरर्बाईन होमलोडला आणण्याची ट्रायल यशस्वी घेणेत आली, असे प्रतिपादन युवा नेते विराज नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाण्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प युवा नेते नाईक यांच्या हस्ते पूजन करून बंद करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कारखाण्याचा सन २०१९-२० हंगामात यशस्वी झाला. सहवीज निर्मिती प्रकल्पातून एकूण ५ कोटी १३ लाख २६ हजार ४७ युनिट वीजनिर्मिती झाली. त्यापैकी ३ कोटी ६१ लाख ८१ हजार ६१४ युनिट वीज निर्यात करण्यात आली. तर,  १ कोटी ५१ लाख ४४ हजार ४३३ युनिट वीज कारखाण्यासाठी वापरण्यात आली. हंगाम संपल्यावर प्रकल्प बंद करण्यापूर्वी टर्बाईन १३.१० मेगावॅट वरून होमलोडला आणण्याची चाचणी प्रकल्प व्यवस्थापक श्री. दीपक पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पडले असून ते कौतुकास्पद आहे. आपल्या हातून भविष्यात असेच चांगले काम व्हावे व त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दाराच्या रूपाने फायदा व्हावा. या वेळी कार्यकारी संचालक राम पाटील, यु. जी. पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments