BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संस्था क्वारंटाईन असणाऱ्यांच्यासाठी लोकनेते फतेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्ट मार्फत चादरी व बेडशीट


संस्था क्वारंटाईन असणाऱ्यांच्यासाठी लोकनेते फतेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्ट मार्फत चादरी व बेडशीट

शिराळा : कोरोना या प्राणघातक आजारा पासून समाजाला वाचवण्यासाठी करावे लागणारे सर्व प्रयत्न व उपाय योजनांत कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
       शिराळा तहसीलदार कार्यालयात चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रष्ट या सेवाभावी संस्थेमार्फत चादर बेडशीट प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी नाईक म्हणाले, कोरोना विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्या विरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करीत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत आहे. हे संकट परतावण्यासाठी सांघिक प्रयत्नाची गरज आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. आज शिराळा येथे संस्था कोरोन्टाईन केल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील नागरिकांच्या सोईसाठी शंभर चादरी व शंभर बेडशीट तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केल्या.
प्रारंभी श्री. कोकाटे यांनी स्वागत केले. या वेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सहाय्यक गट विकास अधिकारी अरविंद माने, हंबीरराव देशमुख, विश्वास महिंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments