BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन कालवडी ठार


बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन कालवडी ठार

शिराळा,ता.२९: बिऊर ( ता.शिराळा) येथील संजय आनंदा पाटील यांच्या वस्तीवरील जनावरांच्या शेडमधील दोन कालवडी बिबट्याने  हल्ला करून ठार केल्या.

   ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. बिऊर गावाच्या पश्चिमेला गावा नजीक संजय  पाटील यांचे जनावरांचे शेड आहे. गुरूवारी नेहमीप्रमाने जनावरांना वैरण टाकून ते घरी आले.आज शुक्रवारी  सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वस्तीवर गेल्यानंतर जनावरांच्या गोठ्यात एक कालवड ठार मृतावस्थेत आढळून आली.तर दुसरी कालवड जागेवर नव्हती. शेड परिसरात शोध घेतला असता दोनशे मिटर अंतरावर शेजारील उसाच्या शेतात बिबट्याने नेवून फस्त केल्याचे आढळून आले. या बाबत पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यावेळी  वनविभागाचे वनरक्षक सचिन पाटील,बाबा गायकवाड,वनपाल चद्रकांत देशमुख,संतोष कदम यांनी  घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे सिद्ध झाले.
यावेळी वनरक्षक सचिन पाटील म्हणाले, सदर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून  रात्रीच्या शेतात जाताना बॅटरी किंवा मोबाईलवर गाणी लावून जावे. शेतात काम करत असताना आजूबाजूला लक्ष ठेवावे. रात्री जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत.गोठ्या रात्री लाईट लावावी. लहान मुलं अंगणात खेळत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे.
 बिबट्याच्या हल्ल्याने आज सकाळपासून बिऊर परिसरातील नागरीक धास्तावले आहेत.गेली पाच सहा महिन्यापासून कांदे मांगले,शिंगटेवाडी, परिसरामध्ये बिबट्याचा वावर व जनावरांच्यावरील हल्ले सुरू असल्याने नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले  आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे.

Post a Comment

0 Comments