विवाह सोहळ्याच्या खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पवार कुटुंबीयांनी दिले २५ हजार रुपये
शिराळा:लॉक डाऊन मुळे अनेक विवाह साधेपणात साजरे केले जात आहेत.अवास्तव खर्च नाही की गाजावाजा नाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करत आहेत. असाच एक विवाह सोहळा पार पडला मात्र या वाचलेल्या खर्चातील २५ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दिली.
शिराळ्याचे रहिवाशी व शिरशी ( ता.शिराळा) येथील भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंगराव पवार व ग्रामपंचायत सदस्या सीमा पवार यांचा मुलगा सुजित याचा विवाह शिराळ्याचे माजी उपसरपंच अशोक गायकवाड व सौ शारदा गायकवाड यांची मुलगी प्रियांका हिच्याशी ठरला.लॉक डाऊन मुळे त्यांचा साखरपुडा ही घरगुती स्वरूपात पार पडला. आज रविवार दि.२४ रोजी त्यांचा विवाह अशोक गायकवाड यांच्या घरी अवघ्या ३० - ३५ लोकांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी आमदार मानसिंगराव नाईक , युवानेते विराज नाईक ,उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, विश्वास कदम , गौतम पोटे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
मुख्याध्यापक पवार यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.
0 Comments