BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देऊन निकम कुटुंबीयांनी केले गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

शिराळा: येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक यशवंतराव सावळा निकम यांच्या उतरकार्य विधीच्या खर्चाला फाटा देऊन गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप करताना आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, राजु निकम, संजयसिंह निकम


उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देऊन निकम कुटुंबीयांनी केले गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

शिराळा,ता.३०: शिराळा येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक यशवंतराव सावळा निकम यांच्या उतरकार्य विधीच्या खर्चाला फाटा देऊन राजु निकम व संजयसिंह निकम यांच्या वतीने गोरगरीब गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप  आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  करण्यात आले.

   यशवंतराव निकम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या उत्तर कार्याच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गरजू लोकांना जीवनावश्यक  वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय निकम कुटुंबीयांनी निर्णय घेतला.
    यावेळी  तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे, पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, नगराध्यक्षा अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष किर्तिकुमार पाटील,नगरसेविका सुनिता निकम, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, प्रमोद नाईक, सुनील कवठेकर, यशवंतराव निकम, उतमराव निकम,  विजयराव नलवडे, विश्वास कदम,कुलदीप निकम,  रोहन निकम, देवेंद्र पाटील, गौतम पोटे,मोहन जिरंगे प्रविण शेटे, दिपाली निकम,प्रतिभा पवार, सुभाष इंगवले  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments