कृषीपंप वीज बिल माफ करा;आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे पदवीधर युवाशक्ती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
शिराळा:शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक यांना निवेदन देताना कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे शिराळा तालुका अध्यक्ष सुरज गायकवाड, उपाध्यक्ष वैष्णव पाटील, दिग्विजय पाटील ,सुमित नांगरे-पाटील, अभिजित साळुंखेशिराळा, ता.२८: शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे,कोरोनामुळे संपूर्ण भारत आज वैश्विक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे.बाजारपेठा खुल्या नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच कुजून गेल्याने त्यांच्या आर्थिक मिळगतीचा मार्ग खुंटले आहेत.ह्यात शेतीपंपाची येणारी मोठ्या रक्कमांची वीजबीले गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहे.कोरोनच्या या संकटात घरखर्च सांभाळून शेतीपंपाच्या विजबिलाच्या खर्चाचा मेळ घालणं शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं आहे. या लॉकडाऊन च्या कालावधीतील साधारणतः तीन महिन्यांची शेतीपंपाची वीजबीले माफ करावीत. किंवा अर्थव्यवस्थेचा विचार करता निम्मी सवलत तरी द्यावी.
या मागणीसाठी पाठपुरावा कुरु अशी ग्वाही आमदार आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे शिराळा तालुका अध्यक्ष सुरज गायकवाड, उपाध्यक्ष वैष्णव पाटील, दिग्विजय पाटील ,सुमित नांगरे-पाटील, अभिजित साळुंखे उपस्थित होते.
0 Comments