विद्यार्थी पासवर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या दोन लक्झरी पोलिसांच्या ताब्यात; प्रवाशी क्वारंटाईन
संबंधित तिघांवर होणार खटला दाखल
शिराळा,ता.२२: शिराळा तालुक्यात रायगड हुन एका विध्यार्थी पासवर दोन लक्झरी मधून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या दोन चालक व पास काढणाऱ्या आशा तिघांवर खटला दाखल करण्यात येणार आहे. बोगस पास काढून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कोकरूड पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.दोन्ही बस मधील नागरिकांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे.रायगड जिल्हा हा कामोठा , वाशी लागून आहे .त्यामुळे रायगड जिल्ह्यातून शिराळा तालुक्यात येण्यासाठी लक्झरी बसचा एकाच व्यक्ती ने विद्यार्थी पास काढला.त्या पासवर दोन बस आणल्या. बस मधील अनेक व्यक्तींचे पास नव्हते. मेणी फाटा(ता.शिराळा) येथील चेक पोस्ट वर एक बस अडवली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तहसीलदार गणेश शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांना माहिती दिली.
दरम्यान पाठीमागे असणाऱ्या दुसऱ्या बस ला चेक पोस्टवर गाडी अडवल्याची माहिती मिळाल्यावर ही बस आटूगडेवाडी दरम्यान मधेच थांबवून त्यातील सर्व प्रवाशी मोकळ्या शेतातून निघून गेले. मोकळी बस मेणी चेक पोस्ट वर आणली.त्या दोन्ही बसेस कोकरूड पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
यामध्ये तहसीलदार शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी दुसऱ्या बस मधून कोण नागरिक आले आहेत त्यांची माहिती घेऊन त्या सर्वांना कोरोन्टाईन केले आहे. चालक व बोगस पास काढणाऱ्या या तिघांवर खटला दाखल करण्यात येणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुंबई हुन आलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ९३ नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यत प्रवेश नाकारून त्याना पुन्हा मुंबईला पाठवले होते. त्यांना गाडी मालकाने बोगस पास काढून फसवले होते.
0 Comments