BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्यावर अंत्यसंस्कार


बिबट्यावर अंत्यसंस्कार

शिराळा, ता.२०:वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा ) येथे करमजाई मंदिराजवळ पडवळवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत ठार झालेल्या बिबट्याच्या बछड्याचे दहन करण्यात आले.
ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी घडली होती. वाकुर्डे बुद्रुक ते पडवळवाडी या मुख्य रस्त्यालागत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.  याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांच्यासह वनपाल चंद्रकांत देशमुख, सचिन पाटील,देवकी ताहसीलदार, प्रकाश पाटील,दादू शेटके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी  त्यावेळी अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावर खरचटलेल्याच्या खुणा व केस आढळून आले होते.रात्र असल्याने शवविच्छेदन  न करता बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो वनविभाग वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आला होता.
आज बुधवारी सकाळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल गावडे यांनी शवविच्छेदन केले. तो बछडा नर प्रजातीचा  ८ ते १० महिन्याचा आहे. मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत आहेत. त्याचे दहन करण्यात आले.  सादर घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  उपवनसंरक्षक पी.बी.धानके, सहायक वनसंरक्षक जी.एस.चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुशांत काळे,वनपाल चंदकांत देशमुख,देवकी ताशिलदार , सचिन पाटील , प्रकाश पाटील करीत आहे.

Post a Comment

0 Comments