स्वातंत्रसैनिक यशवंतराव सावळा निकम यांचे निधन
शिराळा:शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्रसैनिक यशवंतराव सावळा निकम ( वय ९३) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
यशवंतराव निकम यांचा जन्म १५ जुलै १९२७ ला झाला. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या लढ्यात त्याना दोन वर्षे विसापूर येथे व त्यानंतर नाशिक येथे तुरुंगवास भोगावा लागला होता. ते विश्वासराव नाईक (भाऊ) यांचे विश्वासू म्हणून परिचित होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना सोडण्यात आले. यानंतर दोन वर्षे सातारा येथे पोलीस दलातही त्यांनी काम केले.ते शिराळा ग्रामपंचायत सदस्य , शिराळा विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष आदी विविध पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर आमदार मानसिंगराव नाईक तसेच तहसीलदार गणेश शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी अँड. भगतसिंग नाईक , रणजितसिंह नाईक , नगराध्यक्षा अर्चना शेटे , उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील ,सुनंदा सोनटक्के, देवेंद्र पाटील , प्रमोद नाईक , गजानन सोनटक्के, सुनील कवठेकर, बसवेश्वर शेटे आदी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सहा मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन शिराळा नगर पंचायतच्या नगरसेविका सुनिता राजेंद्र निकम यांचे ते सासरे होत तर चंद्रकांत उर्फ राजू निकम व संजयसिह निकम यांचे वडील होत.त्यांच्या रक्षाविसर्जन सोमवार दि २५ रोजी सकाळी १० वाजता शिराळा येथे आहे.
0 Comments