काळुंद्रे (ता. शिराळा) येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून बीजप्रक्रिया व हुमणी कीड नियंत्रण या बाबत प्रात्यक्षिक दाखवताना कृषी विभागाचे कर्मचारी |
काळुंद्रे येथे बीजप्रक्रिया व हुमणी कीड नियंत्रण प्रात्यक्षिक
शिराळा: काळुंद्रे (ता. शिराळा) येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून शेतकरी गट प्रमुखांना बीजप्रक्रिया व हुमणी कीड नियंत्रण या बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.सध्या पेरणीपूर्वी मशागतीच्या कामामुळे सर्व शेतकरी कामात व्यस्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्फत शेतकरी गट प्रमुखांना धुळवाप भात पेरणीपूर्वी करावयाची बीजप्रक्रिया व हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा उपयोग या संदर्भातील प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात सुरवात केली आहे.
यावेळी गावचे सरपंच विजय पाटील, तालुका कृषि अधिकारी जी.एस. पाटील, मंडळ कृषि अधिकारी अरविंद शिंदे , कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर , कृषी सहायक ऋषिकेश भुईकर, उपस्थित होते.
0 Comments