BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विराज इंडस्ट्रिजमध्ये हँड सॅनिटायझर प्रकल्पाच्या नुतन इमारत उभारणीस प्रारंभ

शिराळा येथे विराज इंडस्ट्रिजमध्ये हँड सॅनिटायझर प्रकल्पाच्या नुतन इमारत उभारणीस प्रारंभ करताना युवा नेते विराज नाईक. शेजारी आमदार मानसिंगराव नाईक, सौ. सुनितादेवी नाईक, गोपिचंद लालवाणी, युवराज गायकवाड आदी.


 विराज इंडस्ट्रिजमध्ये हँड सॅनिटायझर प्रकल्पाच्या नुतन इमारत उभारणीस प्रारंभ

शिराळा : कोरोना विषाणू संसंर्ग विरुध्दच्या लढाईत विराज व विश्वास उद्योग समुह पुढे राहून काम करत आहे. आम्ही फक्त बोलत नाही, तर प्रत्यक्षात कृती व नवनिर्मिती करून दाखवतो, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

आज येथील ’विराज इंडस्ट्रीज’मध्ये युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते विराज हँडसॅनिटायझर निर्मिती प्रकल्पाच्या नवीन इमारत उभारणीस प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक सौ. सुनितादेवी नाईक प्रमुख उपस्थित होत्या.
आमदार नाईक म्हणाले, विराज हँड सॅनिटायझर निर्मिती प्रकल्पामुळे तालुक्याच्या औद्योगिकरणात भर पडणार आहे. आम्ही नेहमी नवनिर्मितीच्या ध्यास घेवून काम केले आहे. त्यामुळे औद्योगिकरणास चालना मिळून रोजगार निर्मिती झाली आहे. हँड सॅनिटायझर निर्मिती प्रल्पातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. आज जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांचे सहकार्य घेवून राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अल्कोहोल पासून ’विराज हँडसॅनिटायझर’ प्रकल्पास परवानगी मिळाली आहे. सध्या प्रकल्पाचे काम दोन महिन्यांपासून विराज इंडस्ट्रिजच्या बॉटलींग विभागामध्ये सुरु आहे. स्वतंत्रपणे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने नवीन इमारत उभारणीस प्रारंभ झाला. आतापर्यंत निर्मिती केलेल्या सॅनिटायझर पैकी मतदार संघातील ग्रामपंचायतीना ना नफा, ना तोटा या तत्वावर दिले आहे.
प्रारंभी युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते इमारत उभारणीचा भूमीपूजन व पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी गोपचंद लालवानी, विराज उद्योग समूहाचे सरव्यवस्थापक युवराज गायकवाड व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments