BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी

सांगली: कडेगाव  तालुक्यातील  नेर्ली येथील पुरुष (वय५७) या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृत झालेल्या रुग्णांनाची संख्या चार झाली आहे.
 त्या रुग्णावर मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना मधुमेह होता. सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे . जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments