BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सरपंच सेवा संघाच्या महीला राज्य समन्वयकपदी पुणे येथील सौ.अपर्णा संतोष अत्रे यांची निवड



सरपंच सेवा संघाच्या महीला राज्य समन्वयकपदी पुणे येथील सौ.अपर्णा संतोष अत्रे यांची निवड 

पुणे: सरपंच सेवा संघाच्या महीला राज्य समन्वयक पदी पुणे येथील सौ.अपर्णा संतोष अत्रे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र लॉक डाऊनमुळे सरपंच सेवा संघाचे राज्यसरचिटणीस बाबासाहेब पावसे- पाटील यांनी ऑनलाइन पाठवले आहे.
    अत्रे यांचा अनेक सामाजिक  कार्यात विशेष पुढाकार असतो. त्यांचे महिला सबलीकरणासाठी सुरू असलेले  कार्य व  विविध गावच्या विकासासाठी त्यांची असणारी  तळमळ याचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सर्वानुमते त्यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला.
         यावेळी लक्ष्मण सरवदे, शंकर पोवार ,संजय वाघमारे, रविंद्र पवार , भाऊसाहेब गुंजाळ ,सौ भाग्यश्री नरवडे ,अमोल शेवाळे ,भाऊ मरगळे ,विक्रम भोर, जयकुमार माने,पंकज चव्हाण, पद्माकर कुलकर्णी, शंकरराव खेमनर, लालुशेठ दळवी , नवनाथ शिंदे.गणेश तायडे ,रविराज गाटे ,बाळासाहेब मालुंजकर , प्रदिप हासे, आबासाहेब गवारे रविंद्र पावसे ,शरद उगले, समाधान उदरभरे ,किरण अंत्रे ,सौ. वर्षा गिरी, सौ. मिना बिडगर , भैय्याशेठ शेख कन्नड,भुषण सावंत, विजय तोडकर,,सौअपर्णा अत्रे, कैलास सुरवाडे,जाजू गायकर ,नारायण पोवार, सोनिया गजभिये, सौ.सविता कुलकर्णी, कु योगिता गायकवाड,सतिश कानवडे,राजन गावंड उपस्थित होते.
         यावेळी सौ.अपर्णा अत्रे म्हणाल्या, सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयाने गावाचा विकास   करण्याच्या हेतूने  संपुर्ण महाराष्ट्रात सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून सरपंच व ग्रामविकासात येणाऱ्या अडचणी सोडवण्या बरोबर विविध योजनांची अंमलबजावणी करून सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामपंचायत हे एक गावच्या विकासाचे केंद्र आहे. हे केंद्र विकसित होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची अमलबजवणी चांगल्या प्रकारे कशी करता येईल यावर विशेष भर दिला जाईल. या विकास केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य  लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Post a Comment

0 Comments