जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात थुंकला आणि 500 रूपये दंड झाला ….
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सकाळी शासकीय कार्यालये सुरू होण्याच्या सुमारासच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक जण आला. कोणाचेही लक्ष नाही असे समजून थुंकला आणि इथेच तो चुकला.
त्याच्यामागून निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे येत होत्या. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि थुंकणाऱ्यास लागलेच हटकले, कडे बोल सुनावले.आणि जागेवरच महानगरपालिकेच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना बोलावून घेऊन 500 रूपयांचा दंड केला. आपल्याला थुंकल्याबद्दल 500 रूपयांचा दंड भरावा लागू शकतो हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करणारा या साऱ्या प्रकाराने चांगलाच खजिल झाला.
जिल्ह्यात कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने सदर विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रूपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. असे असताना आजही जे लोक गार्भियांने या बाबीचे पालन करताना दिसत नाहीत अशांसाठी हा चांगलाच धडा झाला आहे. यामुळे यापुढे सार्वजनिक ठिकाणी अस्वचछता पसरवणाऱ्यची यापुढे गय केली जाणार नाही हाच संदेश दिला जात आहे . सदरची घटना जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना समजतात त्यांनी प्रत्येकानेच सार्वजनिक स्वच्छतेबद्दल सजग राहणे आवश्यक असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीत हातभार लावा व कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करा असे आवाहन केले आहे.
0 Comments