BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या महिलेच्या पतीला कोरोनाची लागण


त्या महिलेच्या पतीला कोरोनाची लागण

शिराळा, ता.२०: रेड (ता.शिराळा )येथील मुंबईहून आलेल्या  महिलेच्या पतीस (वय ४८)ही कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यात मुंबईहून आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुका हादरला आहे.
सदर महिला आपल्या पती व दोन मुलासह मुंबईहुन १७ मे रोजी रेड  येथे आली होती. त्यावेळी त्यांना जिल्हापरिषद शाळेत  क्वारंटाईन करण्यात आले होते. सोमवारी त्या पती पत्नीला  ताप आल्याने व घशात दुखत असल्याने  मिरज येथे पाठवण्यात आले होते.
त्यांची कोरोनाची चाचणी केली असता सादर महिलेचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. पतीचा अहवाल आज बुधवारी आला आहे. पती पत्नीला ताप आल्याने दोन मुलांसह मिरज येथे नेण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments