BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खिरवडेच्या त्या पाच जणांच्या घशाचे नमुने मिरजेला पाठवले

खिरवडे: एकास कोरोनाची लागण झाल्याने गावास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव,  दीपक चिलवंत ,जयंत काळे, आर.बी.ठोंबरे, ए. एन.गरुड

व्हिडीओ


खिरवडेच्या त्या पाच जणांच्या घशाचे नमुने मिरजेला पाठवले

शिराळा ता.२५:खिरवडे येथील मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील ५ जणांच्या घशाचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
ते कुटुंब मुंबईहून २१मे रोजी येऊन गावात होम क्वारंटाईन झाले होते. त्यांतील ५६ वर्षीय वृद्धाला शनिवारी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आला.त्यानंतर रात्रीच आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात असणाऱ्या कुटुंबातील ५ जणांचे शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
या गावाची लोकसंख्या ८५० असून २९२कुटुंब आहेत.त्या ठिकाणी  ६पथकांच्या माध्यमातून १२ कर्मचारी घरोघरी सर्व्हे सुरू आहे. गावात औषध फवारणी केली जात आहे. गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार कोकरूड  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक आर.बी.ठोंबरे, ए. एन.गरुड, आरोग्य सेवक एस.बी.पाटील, एस.डी.कोरे, आरोग्य सेविका ए.एम.निगडे, एस.ए.घागरे,एस.एम.कांबळे, ए. एस.खराडे, आशा गटप्रवर्तक सारिका कासार, यु.एन.पाटील,रुपाली सावंत, रेखा पाटील, आर.जे.म्होप्रेकर, पूजा पाटील, वंदना पाटील, सुरेखा मस्कर  हे घरोघरी जाऊन जनजागृती व सर्व्हे करत आहेत.

फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवेला सूट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खिरवडे व मोहरे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी फक्त  अति तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी लोकांना बाहेर जाण्याची परवानगी द्या.अन्यथा कोणाला बाहेर न सोडण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ,प्रविण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव,  दीपक चिलवंत ,जयंत काळे, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments