मुंबईहुन आलेल्या त्या युवकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
अंत्रीकरांना दिलासा
शिराळा,ता.२०:अंत्री खुर्द ( ता.शिराळा ) येथील मुंबई हुन आलेल्या ४२ वर्षाच्या युवकाचा आज कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने दिलासा मिळाला आहे.तो युवक मुंबई येथे होता. ताप आल्याने १२ मे रोजी वाशी येथील रूग्णालयात गेला. त्या ठिकाणी त्याने आपला तपासणी साठी स्वॅब दिला होता. त्या नंतर तो १७ मे रोजी खाजगी गाडीने घरातील पाच जण अंत्री खुर्द येथे आला होता. गावात आल्यानंतर तो स्वतः होम क्वारंटाईन झाला होता.
मात्र मंगळवारी दुपारी त्यांचे मोबाईलवर मुंबई वाशी येथील रूग्णालयातून करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.त्यानंतर त्याने अंत्री प्राथमिक आरोग्य केंद्रास या बाबत माहिती दिली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी स्वप्निल पवार यांनी संबधित मुंबई रूग्णालयात संपर्क साधून अहवालाची खात्री केली. अहवाल पॉझिटिव्ह असल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. आरोग्य विभाग मार्फत त्यांच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्ती व रूग्ण यांना मिरज येथे पाठवण्यात आले होते. काल त्याची पुन्हा कोरोनाची चाचणी करण्यात आली. आज त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य, प्रशासकीय यंत्रणे बरोबर अंत्री ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
0 Comments