BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या आठ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

त्या आठ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

शिराळा,ता.२१: रेड  व अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या त्या आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
      या दोन्ही गावांना दिलासा मिळाला आहे. अंत्री खुर्द येथील एकाचा मुंबई येथील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील पाच जणांच्या घशाचे नमुने मिरज येथे पाठवले होते. ते अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. त्या युवकांचा मिरज येथील अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याने अंत्री ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
              रेड येथील त्या कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या तीन लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या पती  पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रेड गांव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी रेड व अंत्री खुर्द गावांना भेटी देऊन पाहणी केली.या दोन्ही गावात आरोग्य तपासणी व सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू आहे

Post a Comment

0 Comments