त्यांच्या पत्नी अन् मुलीलाही कोरोनाची लागण
मुंबई: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या पत्नी व मुलीला ही कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्यावर अंधेरी येथे उपचार सुरू आहेत.शनिवारी १५ मे रोजी कोरोनामुळे शाहूनगर पोलीस ठाणे(मुंबई) येथे कार्यरत असणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. ते घरीच असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीची कोरोना चाचणी घेण्यात आली.त्यात त्यांचा ही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या दोघींना अंधेरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुलकर्णी यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस सहकारी व इतर लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. अमोल कुलकर्णी यांचा झालेला मृत्यू, त्यांच्या पत्नी व मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह असलेला अहवाल या मुळे पोलीस प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. या शाहूनगर पोलीस ठाण्यात आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती.त्यात कुलकर्णी यांच्या समावेश होता. त्यामध्ये कुलकर्णी यांच्या मृत्यू झाल्याने कर्मचारी हादरले आहेत.कुलकर्णी शिराळा येथील असल्याने त्यांच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.या कोरोनच्या संकटातून त्यांच्या पत्नी व मुलीची लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.
0 Comments