BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाडळीच्या पोलीस हवालदार यांचा मुंबईत कोरोनाने मृत्यू


पाडळीच्या पोलीस हवालदार यांचा मुंबईत कोरोनाने मृत्यू

मुंबई: नागपाडा( मुंबई)  येथील पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथकात पोलीस हवालदार  असणाऱ्या पाडळी (ता. शिराळा) येथील दिलीप विठ्ठल पाटील (वय ४६) यांचा कोरोनामुळे मृत्य झाला.पोलीस दलात असणाऱ्या शिराळाच्या सुपुत्रांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची  दोन दिवसात  दुसरी घटना आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, दिलीप पाटील हे गेली पंचवीस वर्षांपासून पोलीस दलात काम करत आहेत. ते आपल्या कुटुंबा समवेत नागपाडा पोलीस ठाणे परिसरात रहात होते. त्यांना कामावर जायचे असल्याने ते आपल्या पत्नी समवेत तिथे राहिले.लॉक डाऊन सुरू होणार असल्याने त्यांच्या दोन मुली गावी पाडळी येथे आल्या आहेत. पाटील नेहमी प्रमाणे कामावर जात होते. त्यांना १० मे रोजी ताप आला होता.त्यानंतर त्यांना ताप आला नाही पण खोकला होता.  त्यावर उपचार ही सुरू होते.
 शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांना बोलावून नायर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पोलीस ठाण्याच्या गाडीतून नेण्यात आले.पण त्या ठिकाणी  कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यांना तिथे घेतले नाही. तिथून भाटिया हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. प्रारंभी त्या ठिकाणी त्यांना घेण्यास नकार दिला. त्यावेळी रुग्ण व आम्ही सोबत असणारे पोलिस असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यासाठी एक बेड तयार केले. पण दहा मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर पुढील तपासणीसाठी जे.जे हॉस्पिटल येथे मृतदेह नेण्यात आला.  त्याठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.त्याचा रिपोर्ट आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर रात्री उशिरा चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, अविवाहित दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे .त्यांच्या मृत्यूमुळे शिराळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 दुर्दैव दोघांचा मृत्यूनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह

 शिराळा तालुक्यातील दोन दिवसापूर्वी अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला.दुसऱ्या दिवशी पोलीस हवालदार दिलीप पाटील यांचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दोघांचे दुर्दैव एकच अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला.

Post a Comment

0 Comments