BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रेड व मोहरे येथील दोघांना कोरोनाची लागण



शिराळा ता.:२१ शिराळा तालुक्यातील रेड व मोहरे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे .
मुंबईहून आलेल्या रेड येथील पती पत्नीला कोरोनाची लागण झाली असून  आता त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रेड येथे एकाच कुटुंबातील तिघांना लागण झाली आहे. त्या मुलाचा आज कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मोहरे येथे मुंबईहून आलेल्या ५० वर्षीय वृद्धास  कोरोनाची लागण झाली आहे. ते आपल्या कुटुंबासमवेत १२ जणांनसह गावात घरी होम क्वारंटाईन होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. मोहरे येथील त्या वृद्धाच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे काम सुरू आहे. रात्री प्रशासकीय यंत्रणा व  आरोग्य पथक मोहरे गावात दाखल झाले आहे.

Post a Comment

0 Comments