मोहरे गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील मौजे मोहरे गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
बफर झोन पुढीलप्रमाणे - शिराळा तालुक्यातील मौजे मोहरे येथे 1) नाठवडेकडे जाणारा रस्ता – हणमंत सदाशिव पाटील यांचे घर 2) नदजवळील जॅकवेल रुम – श्री गव्हाणे यांचे घर 3) चरणकडे जाणारा रस्ता – भगावान कुंभार यांचे घर 4) नदीजवळील सदाशिव निवृत्ती पाटील यांचे घर – हिंदूराव लक्ष्मण पाटील यांचे घर
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत
0 Comments