BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात दोन कोरोना बाधित तर बलवडी व मोहरे येथील दोन रुग्ण ऑक्सिजनवर


सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात दोन व्यक्ती कोरोना बाधित तर बलवडी व मोहरे येथील दोन रुग्ण ऑक्सिजनवर-जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी


सांगली दि 22 (जि. मा.का) धारावी येथून आलेल्या व्यक्तींपैकी 20 व्यक्ती ॲडमिट करण्यात आल्या असून त्यातील 14 जणांच्या स्वाबचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यातील 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 37 वर्षीय एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर महिला सुट्टीसाठी  उत्तर शिवाजी नगर सांगली येथे येणार होती . तथापि या सर्व लोकांना इस्लामपूर येथेच ताब्यात घेऊन त्यांची रवानगी मिरज आयसोलेशन कक्षाकडे करण्यात आली आहे
वाळवा तालुक्यातील चांदोली वसाहतीतील 22 वर्षीय  तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सदर व्यक्ती पुण्याहून चांदोली वसाहत येथे आलेली आहे.
बोरगाव तालुका कवठेमहांकाळ येथील दोन तरूण बहिणीला सोडण्यासाठी तुमकुर येथे आले होते.या दोन तरुणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
        लक्ष्मी नगर सांगली येथील 52 वर्षीय कोरोणाबाधित रुग्ण उपचाराखली असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तथापि सदर व्यक्तीला फुफ्फुसाचा टीबी असून या व्यक्तीची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी आहे. या कोरोना बाधित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून सदर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांची उपचारासाठी शर्थ चालू आहे .
       बलवडी, तालुका खानापूर येथील 55 वर्षीय पुरुष कोरोना बाधित व मोहरे येथील कोरोना बाधित रुग्ण हे दोघे रुग्ण ऑक्सिजन'वर असून अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. या दोघांवरही डॉक्टरांचे लक्ष आहे.

 सांगली येथील रेव्हेन्यू कॉलनीतील कोरोणाबाधित महिलेचा 14 दिवसानंतर चा कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments