BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांच्यावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार


त्यांच्यावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

सहकारीच झाले नातेवाईक

शिराळा: मुंबई येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिराळच्या सहायक  पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्यावर सायन येथील स्मशानभूमीत  घरचे कोणी जाऊ शकले नसल्याने पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले. तुम्हीच  आमचे कुटुंब असल्याने तुम्हीच माझ्या पतीवर अंत्यसंस्कार करा असे अमोल यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितल्याने अमोलच्या अंत्यसंस्काराला पोलीस कुटुंबीय धावून आले.
शनिवारी सायंकाळची साडे सात वाजता नातेवाईकांच्या शिवाय साहेब आम्हीच तुमचे नातेवाईक म्हणून जड अंतःकरणाने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले.
अमोल यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पत्नी व मुलीला घरातून अंत्यसंस्कारासाठी जात आले नाही.त्यांचे आई,वडील, भाऊ व इतर नातेवाईक गावी शिराळा येथे असल्याने त्यांना मुंबईला जाता आले नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार कोणी करायचा हा प्रश्न होता.अमोल यांच्या पत्नीशी पोलीस यंत्रणेने संपर्क साधला.त्यावेळी त्यांनी तुम्हीच आमचे कुटुंब आहात त्यामुळे आम्ही नसलो तरी तुम्ही अंत्यसंस्कार करा असे सांगितले. त्या एका कुटुंब या शब्दाने संपूर्ण पोलीस खाते गहिवरले.जड अंतःकरणाने अमोल यांना सर्वांनी निरोप दिला. आशा परिस्थिती खंबीर साऱ्या अमोलच्या पत्नीचा सर्व पोलीस यंत्रणेला गर्व आहे.
 अमोल हे शाहूनगर(मुंबई)   येथे  ते कार्यरत होते.त्यांनी रुग्णनिवेदन केले होते. गेली काही दिवस ताप व सर्दी यामुळे आजारी असल्याने घरीच होते. त्यांनी सायन रुग्णालय येथे १३ मे  रोजी कोरोना ची चाचणी केली होती. कला शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांना सायन रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता मयत घोषित केले. शनिवारी त्यांच्या मृत्यू नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला होता. ते शाहूनगर येथे पत्नी व तीन वर्षांच्या मुलीबरोबर रहात होते.ते भांडुप पोलिस स्टेशन  प्रमोशनवर शाहू नगर पोलिस स्टेशनला डिटेक्शन ऑफिसर म्हणुन कार्यरत होते. भांडुप पोलीस ठाण्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अमोल यांच्या या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आशा या लढवय्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांचा अभिमान बाळगत समाज माध्यमावर त्यांच्या श्रद्धांजलीच्या पोस्ट झळकत आहेत.

Post a Comment

0 Comments